मुंबईत पेट्रोल 18 पैसे, डिझेल 31 पैशांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शनिवारी मुंबईत पेट्रोल 88.12 रुपये, तर डिझेल 78.82 रुपये प्रतिलिटर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल 18 पैसे, तर डिझेलचा भाव 31 पैशांनी वाढला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 82.66 तर डिझेल 75.19 रुपये भाव होता. बृहन्मुंबईत पेट्रोल 88.14 तर डिझेल 78.84 प्रतिलिटरवर गेले आहे. ठाण्यात पेट्रोल 88.20 रुपये, डिझेल 77.93 रुपये, पालघरमध्ये पेट्रोल 88.23 रुपये, डिझेल 77.61 रुपये, रायगड पेट्रोल 88.28 रुपये, डिझेल 77.71 रुपये, रत्नागिरी – पेट्रोल 89.09 रुपये, सिंधुदुर्ग पेट्रोल 89.11 रुपये, डिझेल 78.56 रुपये असे दर आहेत.

summary- petrol-price-got-hike