सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ, डिझेलच्या किंमती स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग तिसर्‍यांदा शनिवारी पेट्रोलचे भाव वाढले आहेत. डिझेलचे भाव स्थिर असल्याने तेवढाच काय तो दिलासा सामान्य नागरिकांना आहे.

दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैश्यांनी वाढ झाली आहे. तर चेन्नईत 15 पैश्यांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांत दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत 47 पैसे तर चेन्नईत 50 पैश्यांनी पेट्रोल महागले आहे.

इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार दिल्लीत पेट्रोलची प्रति लिटर किंमत 73.77 रुपये, दिल्लीत 76.47 रुपये तर मुंबईत 79.44 रुपये आहेत. चेन्नईत प्रतिलिटर पेटओल 76.68 पैसे इतके आहेत. सर्व महानगरात डिझेलच्या किंमती स्थिरे आहेत. मुंबईत 69 रुपये प्रतिलिटर डिझेल किंमत आहे.