गेल्या वर्षभरात जवळपास 32 रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानातील पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने तर देशातील सर्व राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे तर डिझेल देखील शंभरच्या जवळपास पोहोचले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका पडत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरात होणारी ही वाढ गेल्या वर्षभरात फारच जलद गतीने झाली आहे. 2020 च्या एप्रिलपासून पेट्रोलच्या दरात तब्बल 32 रुपयांनी वाढले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मुंबईत पेट्रोलचे दर हे 75 रुपये प्रती लिटरच्या आसपास होते. तर जुलै 2021 मध्ये मुंबईत पेट्रोलचे दर हे 107.83 रुपये प्रती लिटर झाले आहेत. म्हणजेच वर्षभरात तब्बल 32 रुपये प्रती लिटर पेट्रोलमागे वाढले आहेत. ही वाढ सामान्य नागरिकासाठी फार मोठी आहे.

आज मुंबईत पेट्रोलचे दर 107.83 तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रती लिटर आहेत. गेल्या दहा दिवसांपासून देशभरात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.17 जुलैला पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढले होते. त्यानंतर या दरात वाढ झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ न झाल्याने या किमती स्थिर राहिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या