
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेसी दोन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यावर असून आज मुंबईत त्याच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मुंबईत कार्यक्रम असल्याने मेस्सीच्या चाहत्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेक चाहत्यांनी मेस्सीचे मुखवटे व टी-शर्ट परिधान करून शुभेच्छा संदेश असलेले फलक हातात घेत त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. (फोटो : रुपेश जाधव)




























































