Photo – उफ्फ तेरी अदा! आलिया भट दिसतेय भलतीच मोहक

राझी, टू स्टेट्स, गली बॉय पासून ते आरआरआर, ब्रह्मास्त्र सारख्या सुपरहिट चित्रपटांची नायिका म्हणजे आलिया भट. आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका तिने आजवर केल्या आहेत. आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका आईची भूमिकाही निभावत आहे. असं असलं तरी तिने अनेक तरुणींना प्रेरणा दिली आहे. नुकतीच तिने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. त्या सोहळ्यासाठी तिने खूप सुंदर पोशाख केला होता. त्या ड्रेसमधील फोटोही तिने शेअर केले असून त्यात ती खूप मोहक दिसत आहे.