Photo – प्राजक्ता माळीचा फिशकट लहेंगामध्ये अनोखा अंदाज…

सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर ‘प्राजक्तराज’ या दागिन्यांच्या ब्रँडची मालकीण देखील आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अंकाऊंटवर पिवळ्या रंगाच्या फिशकट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने लाईम ग्रीन रंगाचा लहेंगा सेट परिधान केला असून, या लहेंगावर जरदोजी आणि भरतकाम केलेले आहे. तसेच वरिल ब्लाऊजवर बीडवर्क केलेले असून बेल स्लीव्हज आहेत. हा लहेंगा कल्की फॅशनने डिझाइन केला आहे.

या फोटोसोबत तिने ‘दिल हारा रे’ असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने “सौंदर्याची खाण” अशी कमेंट केली आहे.