Photo – बॉलिवूडमधला मराठी चेहरा, पाहा मृणाल ठाकूरचे मनमोहक फोटो

बॉलिवूडमध्ये सुपर 30, जर्सी अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. बॉलिवूड अभिनेत्रींच्या मांदियाळीत बऱ्याच काळापासून मराठी अभिनेत्रींचं वर्चस्व राहिलेलं आहे. 90च्या दशकातील माधुरी, सोनाली, उर्मिला या अभिनेत्रींनंतर मध्यंतरीच्या काळात मराठी चेहऱ्यांना फारसा वाव मिळाला नव्हता. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत अनेक मराठी चेहरे बॉलिवूड गाजवत आहेत. मृणाल ठाकूर ही त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात तिचे काही मोहक फोटो