
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील निवडणूक याद्या आणि प्रक्रीयेत असलेल्या घोळाबाबत आक्षेप मांडले. या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.