Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसेच मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी केली व त्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे,  युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.