
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना शिवसेना नेते – खासदार संजय राऊत आणि दै. ‘सामना’चे मुख्य वितरक बाजीराव दांगट.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींच्या अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धाराशीवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख. सोबत शिवसेना खासदार अनिल देसाई.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्याची जाणीव ठेवत दिव्यांग बांधव उद्धव ठाकरे यांना जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून ‘मातोश्री’वर आले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा प्रेमपूर्वक स्वीकार केला. तसेच प्रत्येकाची आपुलकीने विचारपूसही केली.
शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक आहे असे उद्धव ठाकरे छातीठोकपणे सांगतात. जातीधर्मापलीकडची माणुसकी त्यांनी जपली. मुस्लिम बांधवांना उद्धव ठाकरे यांचा तोच स्वभाव आवडला. शनिवारी वाढदिवसानिमित्त मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.