Photo – फक्त मास्कचा वापर करून तयार केला ‘वेडिंग ड्रेस’, वधूचे फोटो व्हायरल

कोरोना संकटामुळे जगभर खळबळ उडाली. या धोकादायक विषाणूपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे हा एकमेव मार्ग आहे. याच दरम्यान फेस मास्क हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. ज्या देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे, त्या देशात मास्क सक्ती बंद करण्यात आली आहे. याच देशांमध्ये ‘इंग्लंड’चाही समावेश होतो. येथील एका डिझाइनरने फेस मास्कचा क्रिएटिव्ह उपयोग करून एका वधूसाठी ‘वेडिंग ड्रेस’ तयार केला आहे.

cac

इंग्लंडमध्ये कोरोना आजारामुळे लावण्यात आलेले सर्व निर्बंध जवळपास दोन वर्षानंतर हटवण्यात आले आहेत. येथील लोक हे दिवस फ्रीडम डे प्रमाणे साजरा करत आहेत. अशातच येथील लग्न समारंभावर लावण्यात आलेले निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात. यानिमित्ताने येथील एका डिझाइनरने खूपच सुंदर वधूचा ड्रेस सादर केला आहे. हा ड्रेस जवळपास 1500 टाकाऊ फेस मास्कने तयार करण्यात आला आहे.

caca

हा ड्रेस ‘टॉम सिल्वरवुड’ने या डिझाइनरने तयार केला आहे. जो जेमिमा हॅम्ब्रोने या मॉडेलने परिधान करून फोटोशूट केला आहे.

untitled-5-copy

आपली प्रतिक्रिया द्या