कॅप्टन दीपक साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

928

केरळच्या कोझिकोडे येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात विमानाचे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. अखेरच्या क्षणीही समयसूचकता दाखवत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन दीपक साठे यांच्यावर आज मुंबईत विक्रोळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदुस्थानच्या हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेले कॅप्टन दीपक साठे हे एअरइंडियामध्ये पायलट होते. विमानाच्या दुर्घटनेनंतर रविवारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. यावेळी एअर इंडियाच्या वैमानिकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यविधी पुत्र शंतनू यांनी पार पाडले. यावेळी दीपक साठे यांच्या पत्नी सुषमा आणि मुलगा धनंजय यांना अश्रू अनावर झाले.

आपली प्रतिक्रिया द्या