पिंपरीत कोरोनाने शंभरी ओलांडली, 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

1168

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आज (मंगळवारी)  निगडी-रुपीनगर येथील  नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुपीनगर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत परिसरात  26 रुग्ण आढळले आहेत. तर, खडकीतील पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या 50 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 73 वर पोहचला असून आजपर्यंत 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 29  जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने सोमवारी (दि. 27) 171 जणांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यात निगडी-रुपीनगर परिसरातील सहा पुरुष आणि तीन महिला असे तब्बल नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 16, 18, 22, 27,  34 वर्षीय पुरुष आणि 15, 18 आणि 19 वर्षीय महिला रुग्ण आहेत. रुपीनगर परिसर हॉटस्पॉट झाला असून आजपर्यंत या परिसरात  26 रुग्ण आढळले आहेत. आज नऊ,  काल (सोमवारी) पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर, 23 एप्रिल रोजी एक आणि 24 एप्रिल रोजी 11 जणांचे रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले होते.  एका रुग्णाच्या
हायरिस्क कॉन्टॅक्टमधून सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.
याशिवाय खडकीतील रहिवासी पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात  दाखल असलेल्या 50 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

मागील 21 दिवसांत 81  नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण,   24 एप्रिल रोजी  एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक,  27 एप्रिल रोजी 11 आणि आज 28 एप्रिल 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील 21 दिवसात तब्बल 81 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 106  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 29  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 73 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 65 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24)  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या