
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी आपल्यावर मूतखड्याची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली आहे. आपल्या किडनीमध्ये मूतखडा असल्याचे निदान झाल्याने तो काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रियेनंतर आपण लवकरच कामाला सुरुवात करू असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी याबाबतचे ट्विट करून ही माहिती दिली आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाल्याने त्यांच्याकडील पदांचा अतिरिक्त कार्यभार पीयुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर आता पीयुष गोयल यांच्यावर मूतखडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया होणार आहे.





























































