गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गुजरातच्या तुरुंगात ब्रँडेड कपडे घालतो. सोशल मीडियातून गरीब तरुणांना भडकवतो. त्याच्या टोळीचे साथीदार हत्येची जबाबदारी घेतात; पण केंद्र सरकार काहीच करत नाही. त्यामुळे बिष्णोई आणि केंद्रीय यंत्रणांमध्ये काहीतरी शिजतंय, असा आरोप पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईने स्वीकारलीं. माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर पुन्हा बिष्णोईचे नाव पुढे आले. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येतही बिष्णोई गँगचे नाव आहे. गुज्जरच्या हत्येवरून पॅनडा आणि हिंदुस्थान या दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी मोदी सरकारवर आरोप केले आहेत.