
अनेकांना एकट्याने प्रवास करण्याची म्हणजेच ‘सोलो ट्रिप’ची मोठी आवड असते. मात्र, जर तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रिपचे नियोजन करत असाल, तर कोणत्या देशाची निवड करावी? हा मोठा प्रश्न समोर ठाकतो. कारण अशा प्रवासात सुरक्षितता, ट्रॅव्हलींग व्यवस्था आणि फिरण्यासाठी योग्य वातावरण यांसारख्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिल्या सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम ठरू शकणाऱ्या अशाच काही सुरक्षित आणि सुंदर देशांबद्दल जाणून घेऊया…
व्हिएतनाम
व्हिएतनाम हा बजेट प्रवाशांसाठी उत्तम पर्याय आहे. येथे राहणे, खाणे-पिणे आणि प्रवास करणे खूप स्वस्त आहे. हा देश सोलो ट्रॅव्हलर्ससाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. येथील निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना खूप आकर्षित करतात.
थायलंड
थायलंडमध्ये पर्यटकांसाठी अत्यंत सोपी आणि उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. येथील लोक खूप मैत्रीपूर्ण आहेत. तसचं भाषेची फारशी अडचण येत नाही. हॉस्टेल आणि बॅकपॅकर्ससाठी थायलंड हे जागतिक केंद्र मानले जाते, जिथे तुम्ही इतर सोलो ट्रॅव्हलर्सशी सहजरीत जोडले जाऊ शकता.
जपान
तुमची सुरक्षितता सर्वात पहिली प्राथमिकता असेल, तर जपान सर्वोत्तम देश आहे. जपानची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (उदा. बुलेट ट्रेन/मेट्रो) जगात प्रसिद्ध आहे. ज्यामुळे एकट्याने फिरणे खूप सोपे होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन संस्कृतीचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो.
- जर तुम्ही पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सोलो ट्रिपचे नियोजन करत असाल, तर व्हिसाचे नियम, स्थानिक हवामान आणि योग्य हॉस्टेल/हॉटेलचे बुकिंग आधीच करून प्रवास सुरू करावा.





























































