
जर तुम्ही दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी आहे तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील पाच सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला जबदस्त मायलेज आणि फीचर्स मिळणार.
Maruti S-Presso CNG
मारुती एस-प्रेसो सीएनजीची प्रारंभिक किंमत ४.६२ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारमध्ये १.० लीटर के-सिरीज पेट्रोल-सीएनजी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ३२.७३ किमी/किलो मायलेज देते, असं बोललं जात आहे. ज्यामुळे ही कार आपल्या सेगमेंटमध्ये खूपच किफायतशीर बनते. ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, मागील पार्किंग सेन्सर्स, ईएसपी, ७-इंच टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले या यासारखे फीचर्स ग्राहकांना या कारमध्ये मिळणार.
Maruti Alto K10 CNG
मारुती अल्टो के१० सीएनजीची किंमत ४.८२ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरते करते. ही कार ३३.८५ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएसपी, रियर सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स ग्राहकांना मिळतात.
Tata Tiago CNG
टाटा टियागो सीएनजीची किंमत ५.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. यात १.२-लिटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. जे ७२ पीएस पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरते करते. ही कार २६.४९ किमी/किलो (मॅन्युअल) आणि २८.०६ किमी/किलो (एएमटी) मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. या कारला ४-स्टार जीएनसीएपी सेफ्टी रेटिंग देखील मिळालेली आहे, ज्यामुळे ही कार सर्वात सुरक्षित बजेट कारपैकी एक बनते.
Maruti Wagon R CNG
मारुती वॅगन आर सीएनजीची प्रारंभिक किंमत ५.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ३४.०५ किमी/किलो (एआरएआय) मायजेत देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईएसपी, मागील सेन्सर्स आणि हिल होल्ड सारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.
Maruti Celerio CNG
मारुती सेलेरियो सीएनजीची किंमत ५.९८ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ३४.४३ किमी/किलो मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियोमध्ये सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएसपी, रियर सेन्सर्स, ७-इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री आणि ऑटो एसी सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार.