उपमुख्यमंत्र्यांसाठी प्लास्टिकमधून पुस्तक आणले; उपायुक्त रवींद्र जगताप यांना 5 हजाराचा दंड

576

विभागीय आयुक्त कार्यालयात राज्य नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले असता त्यांच्या स्वागतासाठी प्लास्टिक कव्हर लावलेले पुस्तक आणल्याचे पाहताच मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी नियोजन विभागाचे उपायुक्त रवींद्र जगताप यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आयुक्तांनी दंड ठोठावल्याचे पाहून उपमुख्यमंत्रीही अवाव्â झाले.

मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार घेताच प्लास्टिकबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपाचे नगररचना विभागाचे सहसंचालक, भाजप नगरसेविकेला दंड ठोठावला होता. आज गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयात आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वागतासाठी पुस्तक आणण्याची सूचना केली. नियोजन विभागाचे उपायुक्त रविंद्र जगताप यांच्या हातात प्लास्टिक कव्हर लावलेले पुस्तक होते. प्लास्टिकचे कव्हर दिसताच मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाच हजार रुपयांची पावती देण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिले. भोंबे यांनी उपायुक्त रवींद्र जगताप यांना 5 हजार रुपये दंडाची पावती दिली. आयुक्तांनी दंड ठोठावताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवाक झाले.

आपली प्रतिक्रिया द्या