प्लॅस्टिकबंदी चित्ररथ ठरला अव्वल!

12

प्रजासत्ताक दिनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या सोहळ्यात पर्यावरण विभागाच्या प्लॅस्टिकबंदी या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात ध्वजवंदना नंतर विविध पोलीस दलाचे संचलन व महाराष्ट्रातील विविध विभागांचे आकर्षक चित्ररथ कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. माहिती संचलनालयाच्या अधिकृत असलेल्या ठाण्यातील ‘न्यू एज मिडिया पार्टनर प्रायव्हेट लिमिटेड’ या जाहिरात एजन्सीने हा चित्ररथ बनवला होता. प्लॅस्टिकने निसर्गाला कसा विळखा घातला आहे हे दाखवण्याकरिता समुद्रामध्ये कालिया नाग देखील प्लास्टिकमय झालाय व त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णा ऐवजी ‘हरित सैनिक’ दाखविण्यात आला होता. चित्र रथाच्या समोरील बाजूस महाकाय कापडी पिशवी देखील बनवण्यात आली होती. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एका कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्ररथांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘न्यू एज मिडिया पार्टनर’ने एकाच वर्षी चार चित्ररथ बनवण्याचा विक्रम केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या