
दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या गर्दीत चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये म्हणून मध्य रेल्वेने सहा प्रमुख स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.