
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गंत खेलो इंडिया योजनेतून पुणे येथे सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल खेळाच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राकरीता 12 वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींची निवड करण्यात येत असून प्रशिक्षण केंद्र पुणे विभागीय क्रीडा संकुल येथे सकाळ व संध्याकाळ सत्रात सुरू राहणार आहे.
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गंत खेलो इंडिया योजनेतून पुढील 4 वर्षात देशातील विविध जिल्ह्यांमध्ये एक हजार खेलो इंडिया केंद्र निर्माण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरीता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे मार्फत 12 वर्षाालील मुले व मुलींची निवड चाचणी 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
निवडचाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता खेळाडू 1 डिसेंबर 2009 रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा. सहभागी होताना खेळाडूने आधारकार्ड ओळखपत्र, जन्माचा दाखला सोबत आणणे आणि खेळाडूची निवड झाल्यानंतर प्रशिक्षणास नियमित उपस्थित राहणे बंधनकारक राहील. जास्तीतजास्त खेळाडूंनी निवडचाचणीमध्ये सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी ए. जी. सोलणकर (भ्र.ध्व.क्र. 9822356197) आणि क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार (भ्र.ध्व. क्र. 9552931119) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.