समृद्धी महामार्ग सुसाट पण मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले! हायकोर्टात 3 मार्चला सुनावणी

मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2021पर्यंत पूर्ण करणार, अशी कोर्टाला हमी देऊनही संथगतीने या मार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

सुमारे 700 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम सुसाट सुरू असून मुंबई–गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मात्र गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर 3 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

कोकणात जाण्यासाठी सोईस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या महामार्ग क्र. 66वर पडलेले खड्डे, खडय़ांमुळे झालेल्या वाताहतीमुळे अॅड. ओवीस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना रत्नागिरीतील शिवफाटा येथे प्रशस्त टोलनाका बांधण्यात आल्याने या टोलनाक्याच्या उभारणीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी पेचकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या