विरोधकांसोबत मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी एक दिवसीय उपोषणावर बसलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक विरोधी पक्षनेते उपोषनस्थळी उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी देखील लखनौला रवाना होण्यापूर्वी त्यांची भेट घेतली. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आंध्र भवनात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मोदी विरोधी पक्षांसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करत असल्याचे आरोप केले आहे.

पंतप्रधान मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे वर्तन करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल म्हणाले, ‘जेव्हा कोणताही नेता एकाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो फक्त एका पक्षाचा नाही तर संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. अशाच प्रकारे जेव्हा एखादा नेता पंतप्रधान बनतो तेव्हा तो कोणत्या एका पक्षाचा नाही तर संपूर्ण देशाचा पंतप्रधान असतो. परंतु ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी विरोधी पक्ष आणि राज्य सरकारांशी वागत आहेत हे पाहून ते हिंदुस्थान नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत असेच वाटते.’

याआधी आंध्रात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधीत पोस्टरबाजी करण्यात आली होती. तसेत कोलकातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या रॅलीत उपस्थित राहून विरोधकांनी एकजूट दाखवून 2019 मध्ये मोदी आणि शहा जोडीला पराभूत करण्याचे आवाहन जनतेला केले.