पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
PM Narendra Modi and French President Emmanuel Macron to hold bilateral talks in Mumbai and inaugurate 'Year of Innovation 2026' on February 17.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यासाठी मॅक्रॉन हे मुंबईत दाखल होणार आहेत.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोक भवन येथे दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात चर्चेला सुरुवात होईल. दोन्ही देशांमधील संबंध आणखी भक्कम करण्याबाबत दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. सुमारे 5.15 वाजता दोन्ही नेते हिदुस्थान-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026चे उद्घाटन करतील. त्यानंतर मॅक्रॉन हे नवी दिल्ली येथील एआय समिटमध्ये सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे रवाना होतील.