राम मंदिर उभारणीत पंतप्रधान मोदींचे बिलकुल योगदान नाही, सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

4476

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. त्यावरून भाजप नेते पंतप्रधानांना इश्वराचा अवतार ठरवत असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कार्यात काहीच योगदान नसल्याचे सांगत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या भूमी पूजनाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्याबाबत बोलताना त्यांनी राम मंदिर निर्माणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचं काहीच योगदान नाही असे सांगितले आहे.

टीव्ही 9 भारतवर्ष या वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिराच्या उभारणीत काहीच योगदान नाही. सर्वोच्च न्यायालयात मंदिरासाठी जो काही युक्तिवाद करायचा होता तो आम्ही केला. सरकारनेही असं काही काम केलेलं नाही केले ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वास्तवात ज्यांनी काम केलं त्यांची नावं मी घेतली आहेत. पहिले तर राजीव गांधी, नरसिम्हा राव आणि तिसरे अशोक सिंघल.’, असे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या