पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदी उत्तर देतील असे वाटत नाही – संजय राऊत

पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदी उत्तर देतील असे वाटत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ खडसे यांच्या जावयावर वॉच ठेवण्याचऐवजी दहशतवाद्यांवर वॉच ठेवला असता तर हा हल्ला झाला नसता असेही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीत पकडण्यात आलं. ही संपूर्ण बाब मला संशयास्पद वाटतं. खडसे यांच्या जावयावर चार दिवस वॉच होता म्हणे. एवढा वॉच पहलगामध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून गेले नसते, ती घटनाच घडली नसती आणि 26 महिलांचे कुंकू पुसले गेले नसते असे संजय राऊत म्हणाले.

तसेच लोकसभा आणि राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. 16 तास असा प्रचंड वेळ आम्हाला चर्चेसाठी दिला आहे. म्हणजे दोन दिवस चर्चा होणार. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी आम्ही दोन दिवस विशेष अधिवेशन मागितले होते पण ते दिले नाही. जेव्हा आम्ही ही मागणी केली होती तेव्हा वातावरण तापलं होतं. मला नाही वाटत पंतप्रधान यावर उत्तर देतील. पंतप्रधान मोदींनी यावर उत्तर दिले तर त्यांना ट्रम्पवर बोलावं लागेल. ट्रम्प यांनी कुठल्या दबावात येऊन हे युद्ध थांबवलं हे सांगावं लागेल. पहलगाम हल्ला ही सुरक्षेची सर्वात मोठी चूक आहे. पूर्ण कश्मीरमध्ये आर्म फोर्स स्पेशल अॅक्ट लागू आहे, केंद्र शासित प्रदेश आहे. सैन्य तुमचे, पोलीस तुमचे तरी 400 किमी आत दहशतवादी आत घुसले आणि आतापर्यंत ते सापडेले नाहियेत. हे गृहमंत्रालयाची सर्वात मोठी चूक आहे. अमित शहांनी राजीनामा द्यायला हवा होता. ही कोर्ट मार्शलची केस आहे असेही ,संजय राऊत म्हणाले.