CAA व NRC विरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या ममतादीदींची मोदींनी घेतली भेट

1133

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौरा शनिवारपासून सुरू झाला आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पहिल्याच दिवशी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) विरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी या भेटाचा फोटो ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मोदींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी त्यांना (मोदींना) स्पष्टपणे सांगितले की आम्ही नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) आणि जनसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात आहोत. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) मागे घेण्याची मागणीही मोदींकडे केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

दरम्यान, कोलकात्यात पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विरोध होत आहे. मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी ‘स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने विमानतळ आणि रस्त्यांवर जनतेने मोठ्या संख्येने उतरावे, असे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर ‘गो बॅक मोदी’ या हॅशटॅगखाली मोहिमही चालवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता दौऱ्याला विरोध; ‘गो बॅक मोदी’ ची झळकली पोस्टर्स

आपली प्रतिक्रिया द्या