
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनवेळी पंतप्रधान मोदी काही दिवस परदेश दौऱ्यावर असतील यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी रविवारी सांगितले की, सरकार आगामी पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी पूर्णतः तयार आहे. हे अधिवेशन 21 जुलैपासून, सोमवारी सुरू होणार आहे. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावरून मागे हटणार नाही आणि संसद सुरळीत चालवण्यास वचनबद्ध आहे असा विश्वास रिजिजू यांनी दिला की. आज दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना जेव्हा त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामावरील वक्तव्यावर विरोधकांच्या भूमिकेबाबत विचारले गेले, तेव्हा सरकार यावर संसदेतच उत्तर देईल, बाहेर नाही असे रिजिजू म्हणाले की .
जेव्हा जेव्हा एखादा मोठा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहतात असे रिजूजी म्हणाले. तसेच या अधिवेशनात सरकार 17 विधेयक सादर करण्याची योजना आखत आहे आणि चर्चेदरम्यान सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील असेही रिजिजू म्हणाले.
संसदेचे अधिवेशन असताना 23 ते 26 जुलै दरम्यान पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असणार आहेत. यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. महत्त्वाच्या वेळी पंतप्रधान परदेशात कसे जातात असा सवाल विरोधकांनी विचारला.