मोदींचे टेक सॅव्ही तरुणांना ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान इनोव्हेशन चॅलेंज’, 20 लाख रुपये जिंकण्याची संधी

1655

देशाला डिजिटल आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान इनोव्हेशन चॅलेंज’ सुरू केले आहे. या चॅलेंजमध्ये लोकांना 20 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. याबाबतची माहिती स्वत: पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत दिली आहे. हे चॅलेंज अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले गेले आहे. ज्यात फोटो एडिंग ते गेमिंग अॅप्स बनवण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे.

हे चॅलेंज नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या भागीदारी अंतर्गत सुरू केले आहे. ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान इनोव्हेशन चॅलेंज’ मध्ये लोकांना मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि फोटो-व्हिडिओ एडिटिंग अॅप्स तयार करावे लागतील. या चॅलेंजतर्गत जास्तीत जास्त 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळू शकते. या अ‍ॅपला ‘मेक इन इंडिया फॉर इंडिया एंड द वर्ल्ड’ हे नाव देण्यात आले आहे. मेक इन इंडिया अ‍ॅप्स तयार करून लोकांना प्रेरित करणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर तुम्हालाही ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान इनोव्हेशन चॅलेंज’ मध्ये भाग घ्यायचा असेल तर innovate.mygov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. 18 जुलै 2020 ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर अर्जाची तपासणी केली जाईल आणि 20 ते 24 जुलै या कालावधीत ही प्रक्रिया सुरु राहील. यानंतर 27 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत याचे मूल्यांकन करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या