पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला परतुरमध्ये

7209
pm-modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जालना जिल्ह्यातील परतुरात 16 ऑक्टोबरला महासभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रचारार्थ या भव्य सभेचे आयोजन केले आहे. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहतील या दृष्टिकोनातून आज 9 ऑक्टोबर रोजी पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्यासह पोलीस अधीक्षक व अधिकारी यांनी शहरातील संभावित स्थळांची पाहणी केली.

शहराच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहील्यांदाच पंतप्रधान येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असेल असे मैदान पाहण्यासाठी बुधवारी पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सभेचे ठिकाण दाखवले. जैन मंदिर ते बीएसएनएल कार्यालय दरम्यान असलेल्या नियोजित सभा जागेची तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी जागांची पाहणी केली. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक एस चैतन्य, पोलीस अधिकारी समाधान पवार, सी, डी, शेवगण, बांगर, हुंबे, सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंता महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या