मी एक सच्चा मित्र गमावला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटलींना वाहिली आदरांजली

473

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी अरुण जेटली यांचा मुलगा रोहन व पत्नी संगीता यांना फोन करून दुःख व्यक्त केले.

‘अरुण जेटली यांच्या जाण्याने मी आज एक सच्च मित्र गमावला आहे. त्यांना मी गेल्या अनेक दशकांपासून ओळखतोय. एखादी गोष्ट समजून घेण्याची त्यांची क्षमता, सखोल ज्ञान हे अभूतपूर्व होते. ते खूप चांगले जगले. त्यांच्यासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांच्या आठवणी ठेवून ते निघून गेले आहेत. ते कायम आमच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात मोदी यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

‘अरुण जेटली व भाजपचे अतूट नाते आहे. एक प्रभावी विद्यार्थी नेता असताना त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशहाीला वाचविण्यासाठी पुढे येऊ लढा दिला होता. ते आमच्या पक्षातील सर्वांचे आवडते नेते होते. गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी वेगवेगळी मंत्रीपदं भूषविली. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, लष्कराची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने, जनतेच्या फायद्याचे कायदे बनविण्यासाठी तसेच इतर देशांसोबत व्यापार वाढविण्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या