
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अहमदाबादला पोहचले. त्यानंतर त्यांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे 32 कॅमेरे लावण्यात आले होते आणि 8 अँगलने मोदींचे फोटो टिपले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱयाचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोसेशनवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे.