व्लादिमीर पुतीन यांना रेड कार्पेट, मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे गुरुवारी नवी दिल्लीत आगमन झाले. जवळपास आठ दशकांपासून मित्र राष्ट्र असलेल्या रशियाच्या अध्यक्षांसाठी हिंदुस्थानने ‘रेड कार्पेट’ अंथरले. नवी दिल्लीतील पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेत पुतीन यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून रवाना झाले.

महाराष्ट्र पासिंगच्या कारमधून प्रवास

महाराष्ट्र पासिंगच्या MH01 EN5795 या कारमधून त्यांनी प्रवास केला. पुतीन यांनी गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ‘डिनर’ घेतले. शुक्रवारी दोन्ही नेत्यांमध्ये हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या बैठकीत संरक्षणविषयक महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेशी दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण बनले असताना पुतीन यांचा हिंदुस्थान दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.