त्याच्या अकाली जाण्याने धक्का बसला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 34 वर्षीय या तरुण अभिनेत्याच्या अकाली जाण्याने बॉलीवूडसह क्रीडा, राजकारण या क्षेत्रातील लोकांनाही धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली.

सुशांत सिंह राजपूतसारखा तरुण अभिनेता अकाली गेला. छोटा पडदा आणि मोठा पडदा त्याने गाजवला. चित्रपट सृष्टीत त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. असा हा गुणी अभिनेता अनेक आठवणी मागे ठेऊन गेलाय. त्याच्या अकाली जाण्याने धक्का बसला. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

img-20200614-wa0016