… ही तर महाराष्ट्र सरकारची किमया! कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितला मुलुंडच्या कोविड केअर सेंटरचा अनुभव

कवी अरुण म्हात्रे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारासाठी ते मुलुंडच्या कोरोना जम्बो सेंटरमध्ये दाखल आहेत. या सेंटरमध्ये रुग्णांना उत्तम सोयीसुविधा मिळत असल्याचे अरुण म्हात्रे यांनी सांगितलेय. यासंदर्भात त्यांनी  फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘ही नव्या महाराष्ट्र सरकारची किमया आहे. अशा सोयीचा मी विचारच करू शकत नव्हतो. पण हे सत्य आहेअसे म्हात्रे यांनी लिहिले आहे.

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरात विलगीकरणात न राहता कोविड केअर सेंटरला मुद्दाम अॅडमिट झालो असे अरुण म्हात्रे यांनी सांगितले आहेएरवी कोव्हिड पेशंटच्या चाललेल्या हालांचे रसभरीत वर्णन ऐकत असतो. उलटसुलट वृत्तांत असतात. ते नेमके कितपत खरे हे मला स्वतः जाऊन पाहायचे होते. हाही अनुभव घ्यायला हव़ा म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये अॅडमिट झालो असे म्हात्रे यांनी लिहिलेय.

त्यांनी पुढे म्हटलेय, काहीशी अभिमानाची गोष्ट आहे की नवी कोविड सेंटर निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. मी जिथे अॅडमिट झालोय ते सेंटर जम्बो सेंटर म्हणून ओळखले जाते. एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रुग्णांना सामावून घेणारे हे सेंटर आणि त्याचे व्यवस्थापन म्हणजे चमत्कार आहे. दोन वेळचे उत्तम जेवण, दोन वेळा चहाबिस्किटे, दिवसातून दोनदा चेकअप होते. यात ब्लड शुगर, ईसीजी, रेटिना टेस्ट, ऑक्सिजन लेव्हल, हृदयाचे फंक्शनिंग, जनरल ब्लड शुगर अशा अनेक चाचण्या चालू असतात. तीन शिफ्टमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, सतत वार्डबॉय असतातया सरकारी कोविड सेंटरमध्ये एकही पैसा खर्च न करता ही ट्रीटमेंट चालू आहे, असे म्हात्रे यांनी सांगितलेय.

आपली प्रतिक्रिया द्या