बापरे! विद्यार्थी शाळेच्या वर्गात असताना आला विषारी साप, वाचा पुढे काय घडलं

चंद्रपूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी वर्गात हजर असताना विद्यार्थ्यांच्या किंचाळण्याचा आवाज आला. आवाज येताच शिक्षक धावून गेले, बघतात तर काय वर्गात जहाल विषारी नाग साप फणा काढून बसला होता. शाळेच्या वर्गात साप असल्याची माहीती लगेच सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र तातडीने शाळेत दाखल होत त्यांनी मोठ्या शिताफीने सापाला जेरबंद केले. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील टोले नांदगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला.

जिल्ह्यातील गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टोले नांदगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विध्यार्थी वेळेवर शाळेत हजर झाले. आप आपल्या वर्ग खोलीत विद्यार्थी जाऊ लागले. यावेळी एका वर्गात चक्क जहाल विषारी नाग साप फणा काढून बसला होता. हे दृश्य बघताच विध्यार्थी घाबरले. विध्यार्थांनी आरडाओरड केली. यावेळी शिक्षक धावून आले. शिक्षकांनी गोंडपीपरी येथील सर्पमित्र दीपक वांढरे, मयूर खरबनकर, सागर झाडे यांना भ्रमणध्वनीने साप असाल्याची माहीती दिली. सर्पमित्रांनी टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळा गाठून मोठ्या शिताफीने विषारी नाग सापाला जेरबंद केले. साप जेरबंद होताच विद्यार्थ्यांनी सूटकेचा निश्वास सोडला. पकडण्यात आलेल्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळेत सूविधांचा अभाव आहे. अनेक समस्यांना विध्यार्थी समोर जात आहेत. आता मात्र विद्यार्थ्यांच्या जिवालाच धोका उद्भवल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.