रत्नागिरीत एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारी टोळी जेरबंद 

295

एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडील लाखो रुपयांचा मुद्देमाला जप्त केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकाला याटोळीची माहिती मिळाली. यापथकाने टोळीचा मागोवा घेत हातखंबा येथे कारवाई केली. पोलिसांनी सागर अंभोरे,महेश धनगर, गणेश लोळते, रोहित शर्मा, विकी वानखेडे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील 2 लाख 43 हजार 400 रुपये आणि स्वीफ्ट कार असा मुद्देमाल जप्त केला. खेड, पुणे, सोलापूर, सांगली, लाचारी, मुंबई, ठाणेसह गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या