पोलीस आयुक्तांच्या परवानगीनंतरच जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये दाखल

1210

संचारबंदी अन जिल्हाप्रवेश बंदी असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीड मध्ये कसे दाखल झाले त्यांना क्वारंटाईन का करू नये असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. मात्र ते मुंबईच्या वरळी येथील निवासस्थानातून नव्हे तर संभाजीनगर येथून पोलीस आयुक्तांच्या परवानगीने बीड मध्ये आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड मध्ये काल नाट्यमय घडामोडी घडल्या, शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये येताच विरोधकांनी हस्तक्षेप करत पोलीस आणि जिल्हाप्रशासनाकडे निवेदन दिले क्षीरसागर हे मुंबईच्या वरळी येथून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना जिल्ह्यात प्रवेश कोणी दिला असा सवाल उपस्थित करत त्यांना क्वारंटाईन करा अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केली होती. या मागणी नंतर त्यांची तपासणी करण्यात आली. आपण वरळी येथून नव्हे तर संभाजीनगर येथून बीडमध्ये आलो आहोत. जिल्हाबंदी असताना आम्ही आलो, मात्र पोलीस आयुक्तांच्या परवानगीने आलो आहोत, हे स्पष्टीकरण जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. ते नियमानुसार शासकीय प्रक्रिया पूर्ण करून बीडमध्ये दाखल झाल्याचा पुरावाही त्यांनी दाखवला.

बीड येताच त्यांनी घेतला आढावा
जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये येताच भ्रमणध्वनीवरून स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा आढावा घेतला. रेशन कार्ड, या बाबतीत येणाऱ्या अडचणी याचा मागोवा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या