चड्डी छोटी शिवली म्हणून पोलिसांत तक्रार, कोर्टात जाण्याचा पोलिसांचा सल्ला

3152

शिंपीने चड्डी छोटी शिवली म्हणून एका व्यक्तीने थेट पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही या व्यक्तीला कोर्टात जाण्याचा अजब सल्ला दिला आहे.

कृष्ण कुमार दुबे हा 46 वर्षीय व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पण लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. दुबे नोकरीसाठी भोपाळमध्ये आला होता. शहरात येण्यापूर्वी त्याने मित्राकडून एक हजार रुपये उधार घेतले होते आणि गरजेपयोगी वस्तू घेतल्या. शहरातल्या एका शिंपीकडे जाऊन त्याने एक चड्डी शिवायला दिली. पण शिंपीने शिवलीली चड्डी खूपच छोटी होती. म्हणून दुबे शिंपीकडे गेला आणि जाब विचारला. तेव्हा शिंपी म्हणाली की तु फक्त दोन मीटर कापड दिले होते म्हणून तेवढीच शिवली. यावर दुबेचे समाधान झाले नाही म्हणून त्याने थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी कोर्टात केस कर असा अजब सल्ला दिला. अखेर शिंपीने पैसे परत दिल्याचे मान्य केल्यानंतर हे प्रकरण मिटले.

 

आपली प्रतिक्रिया द्या