अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. गुरमैल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालयाने चारही आरोपींच्या कोठडीत वाढ केली.
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री वांद्रे येथील कार्यालयाजवळ हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले होते. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे.