पोलिसांचा ड्रोन आला आणि गच्चीवर पत्ते खेळणाऱ्यांची सुरू झाली पळापळ

1426

देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. 21 दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही लोकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे याकरता लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जनताही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना पाहायला मिळते. मात्र काही लोक सरकार आणि प्रशासनाचे न ऐकता स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. असाच एक प्रकार पोलिसांचा ड्रोन फिरत असताना उघड झाला आहे.

‘टिक टॉक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. शहरांमध्ये लॉकडाऊन कसे पाळले जाते आहे, यामध्ये कोणतीही त्रुटी तर नाही, तसेच कोणी नजर चुकवून गैरफायदा तर घेत नाही ना हे तपासण्यासाठी अनेक शहरांमध्ये पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. अशाच रीतीने एका शहरांमध्ये पोलिसांचा ड्रोन कॅमेरा नजर ठेवत असताना त्यांना एका इमारतीच्या गच्चीवर काही लोक पत्ते खेळताना दिसले. या लोकांनी चेहऱ्याला ना मास्क लावले होते, सोशल डिस्टन्सचे कोणते नियम पाळले होते. ज्यामुळे ड्रोन सोबत जोडलेल्या स्पीकर मधून पोलिसांनी उद्घोषणा सुरू केली की, ‘जे लोक इथे उपस्थित आहेत आणि सरकारचे ऐकत नाही अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल’, ही उद्घोषणा होतानाच तिथे जमलेल्या लोकांची पळापळ सुरू झाली. सद्दाम अंसारी नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अन्य युजर देखील हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. मात्र हा गमतीपेक्षा अधिक गंभीर विषय आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सहा हजाराहून अधिक झाली असताना अशाप्रकारे सरकारने घालून दिलेले नियम न पाळता स्वतःसाठी आणि इतरांसाठी धोका निर्माण करणे हे अत्यंत गंभीर आहे. हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://www.tiktok.com/@saddam600/video/6812265298670931201

आपली प्रतिक्रिया द्या