राजकीय पक्षांची कमाई तेजीत; उत्पन्नात वर्षभरात 251 कोटींची वाढ

450

राजकीय पक्षांना वर्गणी, सदस्यता शुल्क आणि देणग्यांतून उत्पन्न मिळत असते. या वर्षी राजकीय पक्षांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2018-19मध्ये देशभरातील 25 राजकीय पक्षांची कमाई एक वर्षात 329 कोटी रुपयांवरून 1155 कोटींच्या पार गेली आहे. वर्षभरात यामध्ये 251 टक्के वाढ झाली आहे.

बिजू जनता दल आघाडीवर

सर्वात जास्त उत्पन्न ओडिशा येथील बिजू जनता दलाने घोषित केले आहे. दुसऱया क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिसऱया क्रमांकावर तेलंगणा राष्ट्र समिती आहे. तीन पक्षांचे उत्पन्न 630 कोटी रुपये आहे. हे उत्पन्न एकूण पार्टींच्या उत्पन्नांपेक्षा 54 टक्केपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार 25 राजकीय पक्षांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी 17 पक्षांनी उत्पन्नात वाढ तर तीन पक्षांनी उत्पन्नात घट दाखवली आहे. फक्त माकपाचे उत्पन्न घटले आहे.

  • आर्थिक वर्ष 2018-19मध्ये निवडणूक बॉण्डमधून सर्वाधिक कमाई राजकीय पक्षांना झाली आहे. याचा आकडा 50 टक्क्यांहून जास्त आहे. देणग्यांमधून राजकीय पक्षांना 300 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. ही रक्कम एकूण उत्पन्नाच्या 26 टक्के आहे.
  • 22 राजकीय पक्षांनी उत्पन्नापेक्षा कमी, 6 पक्षांनी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला आहे.
  • तीन राष्ट्रीय आणि 22 प्रादेशिक पक्षांनी एकूण 442.73 कोटी रुपये खर्च केले आहेत.
  • आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये सपा, शिरोमणी अकाली दल, इनलो, मनसे, रालोद आणि एनपीएफ यांनी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केले आहेत. समाजवादी पार्टीने उत्पन्नापेक्षा 17.12 कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत.

राजकीय पक्ष            2017-18            2018-19

बिजू जनता दल            14.11 कोटी         249.31 कोटी

तृणमूल काँग्रेस             5.17 कोटी          192.65 कोटी

टीआरएस                  27.27 कोटी         188.71 कोटी

वाईएसआर काँग्रेस         14.24 कोटी       181.08 कोटी

सीपीएम                     104.84 कोटी       100.96 कोटी

उत्पन्नाचे स्रोत

  • निवडणूक बॉण्ड   588 कोटी
  • अन्य देणग्या  306 कोटी
  • सदस्यता शुल्क    141 कोटी
  • एफडी – व्याज     116 कोटी
आपली प्रतिक्रिया द्या