लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले, 2019च्या तुलनेत 2020मध्ये सरासरी 40 ते 50 टक्क्यांची घट

481

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ते आधीच केलं होतं. त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. वाहतूक, वाहने, संपूर्ण कार्यालये बंद करण्यात आल्याने याचा मोठा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचे पाहायला मिळते आहे.

दररोजच्या हवा गुणवता निर्देशांकानुसार (A Q I) हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार Centre-run System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR), लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

दिल्लीत प्रदूषणाची पातळी 30 टक्क्यांनी तर पुणे आणि अहमदाबादमध्ये 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. ती ह्या आठवड्यात पुन्हा कमी झाली. गेल्या आठवड्यात प्रदूषणाची पातळी चंद्रपुरात 48.2 टक्क्यांनी कमी झाली. श्वसनासाठी धोका वाढवू शकणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचे प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण 45 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर मुंबईत 38 टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाऱ्या पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाली आहे. कधीही न थांबणारी मुंबई, पुणे, अहमदाबादसारखी अनेक मोठी व्यापारी शहरं कोरोनामुळे ठप्प झाल्याने याचा परिणाम हवेतील प्रदूषणावर होतोय. गेल्या कित्येक वर्षात मोकळा श्वास न घेतलेली मुंबई, अहमदाबाद, पुणे यांसाखी अनेक मोठी शहरं लॉकडाऊनच्या निमित्ताने मोकळा मोकळा श्वास घेताना दिसतायेत. चंद्रपुरात मार्च 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 48.2 टक्के धूळ प्रदूषण कमी झाले आहे.

मार्च 2019 मध्ये मुंबईतील हवा एक्यूआय 153 स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्तर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरुन चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. पण लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली असून वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, नागपूर, महाराष्ट्र आणि देशातच प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. पक्षी शहरात परत येताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या