Viedeo – ‘हरीनामाचा झेंडा रोवला’, रत्नागिरीत पुराच्या पाण्यातही अखंड नामसप्ताह सुरूच

611

रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावातील श्री सांब मदिराला पुराच्या पाण्याने विळखा घातल्यानंतरही श्रावणातील नामसप्ताहात भक्तांनी खंड पडू दिला नाही. पुराचे पाणी छताडावर आले तरी मुखातून ‘हरीनामाचा झेंडा रोवला… हरीनामाचा’ जयजयकार सुरू होता.

आज झालेल्या वादळी पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी,चांदेराई,तोणदे,चिचंखरी आणि सोमेश्वरला पुराच्या पाण्याने विळखा घातला. तोणदे येथील श्री सांब मंदिरात श्रावणातील नामसप्ताह सुरू होता. त्याचवेळी पुराचे पाणी मंदिरात शिरले.पाण्याची पातळी छाती पर्यंत वाढली तरी भक्तांनी हरीनामाचा गजर सुरूच ठेवला.

आपली प्रतिक्रिया द्या