
पूजा खेडकर परदेशात पळून गेल्या आहेत, अटकेपासून वाचण्यासाठी पूजा फरार झाल्या आहे असे सांगण्यात येत आहे. मराठी वृत्तवाहिनी साम मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
पूजा खेडकर यांनी युपीएसससी परीक्षेत खोटी माहिती आणि खोटी प्रमाणपत्र सादर केली होती. त्यानंतर पूजा यांची चौकशी झाली होती. युपीएसससीने पूजा खेडकरांची निवडही रद्द केली होती. पण खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यारोधात गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने पूजाविरोधात जामिनाचा अर्जही फेटाळला होता. त्यामुळे पूजा खेडकरांवर अटकेची टांगती तलवार होती. ही अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरांनी परदेशात पलायन केले असावे असे सांगितले जात आहे.
कोर्टाने फेटाळली याचिका
पूजा खेडकर यांचे वडिल दिलीप खेडकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. असे असले तरी पूजा खेडकरांनी ओबीसी कोट्यातून क्रिमीलेअरचा लाभ घेतला होता. इतकंच नाही तर दिव्यांग असल्याची चुकीची प्रमाणपत्रही सादर केली होती असे आरोप त्यांच्यावर होते. वाशिममध्ये बदली झाल्यानंतर त्यांना काम थांबवण्याचे आदेश दिले होते. तसेच पुन्हा मसूरीला बोलावण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच चौकशीसाठी अटकेची मागणी केली होती. याविरोधात पूजा खेडकरांनी पतियाळा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळला आहे. कोर्टात पूजा खेडकर यांनी स्वतः आपली बाजू मांडली होती.
पूजा खेडकरांना युपीएसएससीसाठी आणखी कोणी मदत केली होती का याचे तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले होते. तसेच पूजा खेडकर यांच्याप्रमाणे कोणी उमेदवार आहे का? दिव्यांगाचे प्रमाणपत्र घेताना निकषांचे पालन झाले नाही याची तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिले होते.