पॉप्युलर रीतिपुस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रामदास भटकळ, मृदुला प्रभुराम जोशी 
लेखक लिहून मोकळा होतो. हस्तलिखित प्रकाशकाच्या हाती येते. म्हणजेच ग्रंथाच्या बाळंतपणाला सुरुवात होते. प्रकाशक सुईणीची भूमिका बजावत असतो. प्रमाणित मजकूर हातात पडल्यानंतर पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, पाठराखण, अक्षरलेखन, आकार, कागद अशी जुळवाजुळव सुरू होते. कोणताही ग्रंथ जसा लेखकाचा तसाच प्रकाशकाचाही असतो. कारण एक क्रयवस्तू म्हणून ग्रंथाला बाजारात आणण्यात लेखकापेक्षा प्रकाशकच अधिक जबाबदार असतो. या प्रवासाचे एक व्यवस्थापनशास्त्र असते, त्यांचे म्हणून नीती-नियम असतात, या गृहाची एक मूल्यव्यवस्था असते, सुईणीचा एक धर्म असतो. तो धर्म पाळूनच ग्रंथ वाचकांच्या हाती येत असतो. या दीर्घ गूढ प्रवासाबाबत मराठीत एक अवाक्षरही नाही. ‘रीतिपुस्तक’ हे याबाबतचे मराठी साहित्यातील पहिले विधान आहे.