बसस्टॉपवरील डिजीटल जाहिरातीत झळकले ‘पॅार्न’, प्रवाशांमध्ये खळबळ

1013

कोणत्याही उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी त्याची आकर्षक अशी जाहिरात करणे गरजेचे असते. आकर्षक जाहिरातच त्या उत्पादनाची ओळख होते. कोणतीही जाहिरात ग्राहकांचे लक्ष कसे वेधता येईल याचा विचार करून बनविली जाते. जाहिरातींवरील एखादी सुंदर वस्तू आपल्याला आकर्षित करते तर कधी त्या जाहिरातीतील अभिनेता- अभिनेत्री, त्यांचा पेहराव आपले लक्ष वेधून घेतो. मात्र, जाहिरात फलकावर अचानक ‘पॅार्न’ झळकला तर…असा धक्कादायक प्नकार घडलाय स्विडनमध्ये नुकताच घडला आहे.

स्विडन शहरातील नेहमी गजबजलेल्या ‘सेंट्रल रेल स्टेशन’ बाहेरील बस स्थानकावर अचानक बदललेल्या जाहिरातीमुळे एकच खळबळ उडाली. डिजीटल जाहिरात फलकावर अचानक नेहमीच्या जाहिरातीऐवजी अश्लील फोटोसह पॉर्नची जाहिरात झळकू लागली. अॅडल्ट वेबसाइटवरील ग्राफीक स्वरूपातील ही अश्लील चित्र आणि जाहिरात सुमारे 15 मिनीटे झळकत होती. या घृणास्पद प्रकारामुळे स्विडनच्या दक्षिण-पुर्व भागातील कलमार्स सेंट्रल स्टेशन येथील जाहिरातीच्या स्क्रीन तातडीने बंद करण्यात आल्या.

या प्नकाराची अधिकाऱ्य़ांनी दखल घेत चौकशी सुरू केली. त्या चौकशीत एका बसचालकाकडून तांत्रिक चूक झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. डिजीटल जाहिरात स्क्रीनचे नियंत्रण असलेल्या एका बस चालकाने त्याच्या जवळील स्क्रीनवरच अश्लील चित्र पाहिले. त्यामुळे बसस्टॉपवरील डिजीटल स्क्रीनवरही जाहिरातीऐवजी पॅार्न झळकले. स्विडनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी या घटनेसाठी हॅकर्सना जबाबदार ठरवले आहे. मात्र, या वृत्ताला प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या