
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने स्वतःला आयएएस अधिकारी आहे, असे सांगून मुलीच्या वडिलांकडून तब्बल 15 लाखांचा हुंडा घेतला. तसेच लग्न थाटामाटात केल्याने मुलीच्या वडिलाला 30 लाखांचा खर्च आला. लग्नानंतर अवघ्या काही तासांत नवरीला नवरदेवाचे सत्य समजल्याने मुलीच्या वडिलांनी नवरदेवाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रीतम कुमार निषाद असे या नवरदेवाचे नाव आहे. प्रीतम कुमारने स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. आपली पोस्टिंग माणिकपूर येथे आहे, असे सांगून मुलीच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा विश्वास संपादन केला. यासाठी त्याने बनावट मुलाखतीचे व्हिडीओ, ऑफिसचे फोटो आणि नेत्यांसोबतचे फोटोही दाखवले. मुलीच्या वडिलांनी लग्न थाटामाटात केले. यासाठी त्यांना 30 लाखांचा खर्च आला. दुसऱ्या दिवशी मुलीची पाठवणी केली. त्यानंतर नवरीला एका व्यक्तीने फोन करून नवरदेव आयएएस नसल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर नवरीने वडिलांना सांगितले.
























































