कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस अपघातात दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आयबी अर्थात गुप्तचर विभाग आणि एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाकडून तपास सुरू आहे. दोन्ही पथके कानपूरमध्ये पोहोचली असून रेल्वेने पनकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआरदेखील दाखल केला आहे.