येत्या दोन वर्षांत पोस्टाचे विमा युनिट सुरू होणार

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टपाल खात्याच्या पेमेंट बँकेला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यानंतर येत्या दोन वर्षांत टपाल खात्याचे स्वतःचे विमा युनिट सुरू होणार आहे. टपाल खाते आता नवे रूप धारण करीत आहे. यात आता इन्शुरन्स कंपनीची भर पडणार आहे अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

1 सप्टेंबर रोजी पोस्ट पेमेंट बँक सुरू केली. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत देशातील एक लाख 55 हजार पोस्ट ऑफिसांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्याचे ध्येय आहे. पोस्टाची पार्सल सेवा सुरळीत करण्यासाठी पार्सल संचालनालयही उभारण्यात आलेले आहे.

या सुविधांमध्ये आता विमा योजनेची भर पडणार आहे. सध्या पोस्टातर्फे सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकच जुनी विमा योजना चालवली जाते. ‘पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ असे या योजनेचे नाव असून ती 1884 पासून सुरू आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत वर्गासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा ही योजनाही सुरू आहे.

summary-postal department to start insurance unit soon

आपली प्रतिक्रिया द्या